Site icon Youth Ki Awaaz

गिधद्यांचे मेळे…!

गिधद्यांचे मेळे…! 

उघड उघड डोळे
बघ ते गिधाडांचे मेळे 
एकावर एक एकच
दोनावर दोन दोनच 
नुसता पाटी पुस्तक घोळे 
एकावर एक लोळे 
खालचा शब्द तोंडात पळे 
उघड उघड डोळे 
बघ गिधडांचे मेळे…

गिधाड वाचतोय नुसता कागद
नाचतोय हटक्या तालावर…
तीरखी नजर वालीच्या,
म्हणल भेदरलेल्या तोंडाने 
बघ कशी खळी पडली,
तिच्या गोऱ्या गालावर…
अन् म्हणे कागद वाचू वाचू 
अख्खी जिंदगी सडली ,
उघड उघड डोळे
बघ गिधड्यांचे मेळे…

गिधाड नुसता बघतय पुतळे
हार घालतोय,
पाण्यानं धूतोय ,
रंग मारतोय, 
नुसता पूजा करतोय पुतळ्यांची 
गिधाड नुसता वाचतोय कागद,
उघड उघड डोळे 
बघ गिधड्यांचे मेळे…

गिधाड झाला युवा नेता
सगळं आमदार घेता
अन् हा गु  खाता 
बोंबला आमचा नेता
फळं देता
काय कोणाचं घेता
उघड उघड डोळे 
बघ गिधद्यांचे मेळे…

असले गिधाड होईल मंत्री संत्री
लावतील त्यांचेच मळे 
गाड्या त्यांचं लेकरू खेळे
घोडा आपणास पाडून वळे 
लावतील त्यांचेच मळे 
आपल्याला का खुटा कळे 
आपण घ्या फक्त केळे 
लेले केळे लेले केळे 
उघड उघड डोळे 
बघ गिधद्यांचे मेळे…
                    – वैभव बंगाळे

dist. buldhana 

mob.8767357347

Exit mobile version