Site icon Youth Ki Awaaz

विद्रोहाची वाटचाल!

हा शिकलेला सावरलेला समाज कुठे जातो हो!!

जेव्हा लाख मोलाची जमीन माझी कोराडखाऊ होते,

अन् सत्ताधारी लोकांचे मन बेरड होते.

दिवसढवळ्या लेकी बळी भोगल्या जाता

अन् भोगणारे माणूस पणाच्या पदराखाली काळोखात खुले आम नाचता.

शाळेच्या वर्गांना छते नाही पण राम मंदिराची केवढी ओ ती घाई!

लोकशाहीचा चौथा स्तंभ ना रे तू?

सरकार ची कटपुटली म्हणून का नाचतोस?

सेलिब्रिटींच्या बातम्यांसाठी होतोस भिकारी,

दीन दुबळ्याच्या व्यथा सांगायला सावत्रपणा करतो?

सृष्टी निर्मातिला म्हणतोस का रे शिऊ नको देवाला,

इतर वेळेला जवळ असणारी ती,त्या वेळेला शिवत पण नाहीस तिच्या तडपत्या देहाला!

महागाईच्या सरणावर मांडतात आमची प्रेते, आग लावतात भांडवलदार अन् बघतात आमचे नेते !

पैसा गरिबी दाखवतो

त्याच गरिबांना पैसे देऊन संसदेत जाऊन बसता तुम्ही

इलेक्शनच्या वेळेस हात जोडत,

इलेक्शन नंतर विश्वास तोडत दिसता तुम्ही!

एका भाकरीच्या तुकड्या साठी होतेय ससेहोलपट,

पण सत्ताधाऱ्यांच्या अंगावर दिसता लाखोंचे कोट!

एकाच माई च्या उदरातून जन्म घेतला ना सगळ्यांनी,

मग तुम्ही काय म्हणून बेडवर

आणि आम्ही काय म्हणून रोडवर?

प्रत्येक धर्माला रंग दिलाय निवडून,

पण नशीब! अजून रंगांचे धर्म नाही झाले!

शिकून सवरून मोठा केला,

वाटलं होईल म्हातारपणी सहारा,

महागाईच्या स्फोटामुळे त्याने कमवलेलं त्यालाच पुरेना!

समानतेची गोष्ट करणाऱ्यांनो,

गलिच्छ काम करणाऱ्याला अछूत समजता,

अन् वर्चस्व गाजवून फुकट खणाऱ्याला श्रेष्ठ का!

समाजाचा आरसा म्हणजे माझा विद्रोह!

मग समाजात गटार असेल तर माझ्या विद्रोहात येणारच ना!

-दिव्या विजय देशमुख!

माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय, छ. संभाजीनगर.

मू.पो. रांजणगाव देशमुख, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर.

Exit mobile version