Site icon Youth Ki Awaaz

मी ईश्वर साक्ष शपथ घेतो की…!

मी ईश्वर साक्ष शपथ घेतो की…!

मी ईश्वर साक्ष शपथ घेतो की
मी या देशातील मातीतल्या शेतकऱ्यांना
त्याच मातीत त्यांची माती करणार…
मी या देशातल्या अडाणी व मूर्ख लोकांना
भावनिक करून जातीधर्माचे द्वेष पाजनार…
मी या शेतकऱ्यांचा तोंडातला घास ओढून
 उद्योगपतींच्या गांडीचा वास घेणार …
मी इथल्या विद्यार्थ्यांना चुकीचे व अपूर्ण ज्ञान देऊन
इथल्या शिक्षण व्यवस्थेची घाण करणार…
मी त्यांना शिकण्याचा वयात हातात झेंडे देणार 
नंतर हक्कासाठी रस्त्यात आले तर त्यांनाच दांडे मारणार…
मी सरकारी कर्मचाऱ्यांवर वेळेचं व कामाच दडपण आणील 
आणि त्यांच्या पेन्शनची वाट लावील…
मी असे कायदे नवनिर्मित करेल 
की त्याचे सर्वसामान्यांना नाही तर मला फायदे होईल…
मी इथल्या दगडातल्या देव, देवींची भक्ती करणार
आणि सजीव स्त्रियांवर उपभोगाची सक्ती करणार…
मी इथल्या शेतकऱ्यांना पिकविमे देणार
आणि सत्तेवरच्या द्वेषाचे राजीनामे घेणार…
मी इथल्या देवळात खोटी आरती आणि मस्जिदिद खोटी नमाज पढणार
आणि इथली धार्मिक समजणारी पण अधार्मिक जनता आणि समाज धर्मापायी बिघडवणार…
मी गोठ्यातील गाय घरात ठेवील
पण घरातील माय दारात परात वाजवत ठेवील…
मी ईश्वर साक्ष शपथ घेतो की …
मी माझ्या कुटुंबाचा ,माझ्या नातेवाईकांचा , माझ्या सर्व बँक अकाउंट्सचा मेळ बसवून 
संपूर्ण देशाचा खेळ करणार….
मी ईश्वर साक्ष शपथ घेतो की …
दगडातले देव तर माझ्या स्वार्थासाठी असणार
खरा देव तर मीच तुम्हाला भासणार…

                                 – वैभव बंगाळे

dist.: buldhana

mob.: 8767357347

Exit mobile version