Site icon Youth Ki Awaaz

व्हाट्स अँप आणि अतरंगी पणा

कोणे एके काळी हजारो वर्षांपूर्वी एक माकड आनंदी आयुष्य जगत होतं । मग काळाची चक्र फिरली आणि त्या माकडाचा माणूस झाला ।हळूहळू कुटुंब ,गाव ,समाज ,शहरं तयार झाली । मग प्रत्येक माणसाची वैयक्तिक आणि सामाजिक अशी दोन प्रकारची ओळख तयार झाली । प्रत्येक माणूस नैसर्गिकरित्या समाजात वावरत असताना आपण कस चांगलं असू याचा अतोनात प्रयत्न करत असतो ।काही वेळेस खरा तर काही वेळेस नुसतं ढोंग । अशा प्रकारे आपण सगळी माकड आज स्वतःला सुसंस्कृत समाजाचा भाग म्हणवतो । माणसाची एकमेकांशी संवाद साधण्याची कला वाखाणण्याजोगी आहे । काळानुसार ती बदलत गेलीये पण संवाद आणि त्या तील गोडवा असो वा कडवट पणा हा निरंतर पणे जाश्याच तसा आहे । आधी गावातील झाडाखाली बसून लोक एकमेकांशी संवाद साधायचे , स्त्रिया ओट्यावर बसून सुख दुःख तसेच चुगल्याही करायच्या । हि प्रक्रिया अखंड पणे चालत आलेली आहे ।त्यांत काहीही बदल नाही ।जसे की झाडाखाली बसून गप्पा मारत असलेली मंडळी किंवा ओट्यावर बसलेल्या स्त्रिया शहरिकरणांमुळे गार्डन मध्ये आल्या असतील तरीही त्यांची चुगल्या करण्याची सवय गेली असेल अस मुळीच नाही । शिक्षणानुसार हि काही फरक पडत नाही । तो प्राचीन काळ असो ,मध्ययुगीन काळ असो वा आधुनिक काळ हा प्रवाह कमी अधिक प्रमाणात सारखाच आढळून येतो । आणि आज हेच कट्टे व्हाट्सअप ग्रुप च्या रूपांनी समोर येऊन ठेपलेत । इथेही माणसाची (वाचा “माकडांची”) वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यात संवाद साधताना सारखीच कर्मकांड सुरु आहेत ।असं म्हणायला वाव खूप कमी आहे की ,संवाद माध्यमं बदलली म्हणून माणसं जास्त खरी वागायला लागलीत किंवा जास्त तर्क लावून विचार करायला लागलीत । सामान्यपणे असं म्हणता येईल की झाडावरची माकडं झाडाखाली आली आणि आता व्हाट्सअप्प वर । इथेहि प्रतिष्ठेची अतिशोयक्ति ,अहंकार ,भाऊंची हवा ,अडमिंचा सम्मान ,जातींचा बडेजाव इ. कर्मकांड येतातच । कधी कधी तर याला ग्रुप वर ऍड का केलं ,त्याला का नाही केलं ,त्यानी मैसेज वाचून पण इमोजी नाही पाठवला ,स्टेटस पाहिलं पण कौतुक नाही केलं ,हा माझ्या पोस्ट वर का कंमेन्ट करतो ,bday wishes देताना एवढ्या काय smile ,cake , बत्तीश्या सेंड करायच्या आपण तर फक्त HBD पाठवतो रे बाबा अशा प्रकारे काही नग सतरा पगडीच्या अभिमानानी सांगत असतात ,असं सांगताना त्यांचा सूर तर असा काही असतो कि alexandarनेहमी सल्ला घ्यायला याच्याजवळच यायचा , अगदी ग्रुप च्या नावावरून देखील नखरे होताना दिसतात इ,. प्रकारचे अतरंगी नमुने व्हाट्सप्प वर दिसतात । इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की ,भारतीय समाज व्हाट्सअप्प वर आला म्हणजे विचारांनी आधुनिक किंवा प्रगत झाला हे म्हणणं तितकंसं बरोबर नाही । या संदर्भात आपल्या समजाच कौतुक करावं तितकं कमीच आहे . समाजाच्या विविध स्तरावर विविध कुटुंबांच्या ,विविध क्षेत्रातील लोकांच्या ,विविध व्यवसायाच्या लोकांच्या ,विविध वर्गाच्या लोकांच्या चलिरिति ,मान सन्मान ,बोलण्या चालन्यातील बड़ेजाव पना यांत लक्षणीय बदल दिसून येतात . कधी आपल्याला हवेवेसे वाटणारे ,अंगीकृत करावे असे तर कधी उद्धट पणाचे अनुभव सतत येत असतात .त्यांच्या expressiveness मध्ये कमी जास्त प्रमाणात फरक दिसून येतो .जसा एक वर्ग असतो की जो “thank you ,sorry ,pardon me ,by ,see u ,good night ,good morning ” हे भाव(फॉर्मलिट्या) आपापल्या भाषेत व्यक्त करत असतात .यांचं बरोबर कुटुंब बरोबर एकदा तरी जेवण करणे ,रविवारी सामूहिक वेळ घालवणे इ. सवयी आचरणात आणत असतात .आता समजा हाच वर्ग whatsapp वर आला तर तो तिथेही असाच वागतो . अशाच प्रकारे दुसरा वर्ग जो सगळ्या गोष्टींना taken for granted घेतल्यासारखा वागतो . म्हणजे कोणी याला “गुड मॉरनिंग किंवा राम राम ” जरी म्हटलं तर हा विचार करतो की “अशा प्रकारे आपण आजपर्यंत तर व्यक्त झालो नाही आणि आता झालो तर लोक काय म्हणतील ,असं चांगलं नाही दिसणार ” ,या सारखाच एक वेगळा वर्ग देखील असतो जो समजा “राम राम ” केलं तर “राम राम ” करतो पण मोजून ठेवतो कि त्यांनी पहिले केलं की मी आणि कितीवेळा .मग पूर्ण accounting करून ठरवतो कि यापुढे कसं व्यक्त व्हायचं . मग जेव्हा हे सगळे लोक्स whatsapp वर येतात तेव्हाही यांच्या वागण्यात काही बदलेलं दिसेल असं नाही . निळ्या कांड्या दिसल्यावर सगळेच ईमोजी पाठवतील असं नाही ,मग तो ignore करण्याचा feeling हि काही माकडांना येत असावा .नंतर झाडाखाली ,चहाच्या टपरीवर ,संध्याकाळी एखाद्या दुकानात इ. ठिकाणी whatsapp वरचे रीतिरिवाज ,कर्मकांड यावर चर्चा होताना दिसते .कधी मतभेद तर कधी आनंद हे अनुभव येतच राहतात . म्हणजे एकंदरीत काय तर ,भारतीय समाज virtual जगात whatsapp मुळे आला तर खरा पण मूलभूत स्तरावर आमूलाग्र बदल झाला असं काही म्हणता येणार नाही आणि येणारा काळ काय बदल घडवेल हे कोणाला माहित ?? तोपर्यंत वाट पाहू आणि सध्याच्या virtual समाजात मज्जा करू ,छोट्या छोट्या गोष्टींत आनंद शोधू आणि पुढे जाऊ ….!
?️?️शुभम मानेकर

Exit mobile version